परतीचा पाऊस लांबणार हवामान खात्याचा अंदाज.
आज ६ ऑक्टोबर : आज रात्री आणि उद्या विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली, तसेच मराठवाड्यातील नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. लातूर, हिंगोली, परभणी येथेही पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
उद्या (७ ऑक्टोबर): पावसाचा जोर किंचित कमी होईल आणि तो उत्तर कोकण (पालघर, ठाणे, मुंबई), उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपुरता मर्यादित राहील.
८ ते १० ऑक्टोबर: या काळात पावसाचे प्रमाण आणखी कमी होऊन तो प्रामुख्याने दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणापुरता सीमित राहील.
११ ऑक्टोबर: आठवड्याच्या अखेरीस मान्सून उत्तर महाराष्ट्रातून माघार घेण्यास सुरुवात करेल आणि पावसाची शक्यता केवळ कोल्हापूर, सिंधुदुर्गसारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येच राहील.
गेल्या २४ तासांत परभणी, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.








