राज्यात 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या जिल्ह्यात मोठा पाऊस पंजाब डख.
आजपासून म्हनजेच 4, 5, आणि 6 ऑक्टोबर दरम्यान काही तुरळक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, पण तो मोठा नसल्याने घाबरण्याचे कारण नाही असे पंजाब डख यांनी सांगितले…
पंजाब डख यांच्याकडून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की, काढणी केलेले सोयाबीन दुपारपर्यंत (3-4 वाजेपर्यंत) वाळल्यानंतर लगेच ते ढिगालात मारावे आणि येणाऱ्या दोन-चार दिवसांच्या पावसाळी वातावरणामुळे सुरक्षितता म्हणून झाकून ठेवावे…
4 ते 7 ऑक्टोबर दरम्यानचा अंदाज
हा पाऊस सर्वदूर नसेल,फक्त तुरळक ठिकाणी भाग बदलत होईल.4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्याच्या तुरळक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर पडणार नाही, तर फक्त काही निवडक ठिकाणी पडेल (उदा. 100 पैकी 10 गावांत).
चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस चालू राहील. तसेच नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती या पट्ट्यात आणि लातूर, बीड, जालना, परभणी, संभाजीनगर या मराठवाडा पट्ट्यातही 5, 6 आणि 7 तारखेला तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस जोरदार स्वरूपाचा नसेल आणि तोही 7 ऑक्टोबरला या भागातून पूर्णपणे कमी होईल…
मान्सून माघारीची निश्चित वेळ आणि थंडीला सुरुवात कधी
महाराष्ट्रातून मान्सून आता पूर्णपणे माघार घेत आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे 70% भागातून पाऊस माघार घेईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 15 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून (100%) पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर राज्यात कुठेही पावसाची शक्यता राहणार नाही असे पंजाब डख यांनी सांगितले..
15 ऑक्टोबर नंतर राज्यात पावसाऐवजी थंडी जाणवायला सुरुवात होईल, ज्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल.
रब्बी हंगामासाठी नियोजन
मान्सून पूर्णपणे माघारी गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीला लागावे. विशेषत: हरभरा आणि गहू या पिकांची पेरणी 20 ते 30 ऑक्टोबर दरम्यान करायला काही हरकत नाही. थंडीचा जोर चांगला असणार असून, 2 नोव्हेंबर पासून कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात होईल. भविष्यात केवळ एखादा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यासच, अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे.
यंदा गारपीट होनार का ?
गारपिटीची शक्यता सध्या नाही, मात्र दरवर्षीप्रमाणे 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान गारपीट होऊ शकते असे पंजाब डख म्हनाले..








