दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

रामचंद्र साबळे अंदाज ; या जिल्ह्यात 8 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पावसाचा अंदाज?

रामचंद्र साबळे अंदाज ; या जिल्ह्यात 8 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पावसाचा अंदाज?

आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर ते शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढेल. जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा पावसाची शक्यता कमी होते. महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या चार दिवसांत आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील तर बराच काळ लख्ख सूर्यप्रकाश राहील. किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून सकाळी हवामान बहुतांशी महाराष्ट्राच्या भागात थंड वातावरण राहील अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

पुढील 4 दिवस पाऊस कसा ?

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या चार दिवसात १० ते २५ मिलीमीटर, रत्नागिरी व ठाणे-पालघर जिल्ह्यात ५ ते १५ मिलीमीटर आणि रायगड जिल्ह्यात ५ ते १० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे…

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात ५ ते १५ मिलीमीटर पावसाची शक्यता असून नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ३ ते १० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात १ मिलीमीटर, मध्य विदर्भातील सर्व जिल्ह्यात १ मिलीमीटर तर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात १ ते २ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ विदर्भात फार पावसाची शक्यता नाहीये असे साबळे म्हनाले.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात या चार दिवसात ५ ते २० मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून सोलापूर व पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ३ ते १० मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले…

अधिक सविस्तर माहितीसाठी youtube व्हिडीओ पहा

Leave a Comment