दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

शक्ती चक्रीवादळ अपडेट ; चक्रीवादळाची तीव्रता वाढली पहा सध्या कुठे आहे चक्रीवादळ.

शक्ती चक्रीवादळ अपडेट ; चक्रीवादळाची तीव्रता वाढली पहा सध्या कुठे आहे चक्रीवादळ.

शक्ती चक्रीवादळ अपडेट ; हवामान विभागाने अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्यांनाही इशारा दिलाय. त्यांनी 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वायव्य अरबी समुद्र, त्याला लागून असलेला ईशान्य अरबी समुद्राचा भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागानं स्पष्ट केलंय.

किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिकृत आणि ताज्या माहितीसाठी IMD च्या वेबसाइमधील या विभागावरील अपडेट चेक करा.

हवामान खात्याच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, ईशान्य अरबी समुद्रावरील ‘शक्ती’ (Shakhti) चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये (शनिवार 4 ऑक्टोबर सकाळी 11.30 पर्यंत) वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे त्याची तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळी वादळ बनले आहे.

हे वादळ शनिवारी ( 4 ऑक्टोबर) सकाळी 8.30 वाजता वायव्य (Northwest) आणि ईशान्य (Northeast) अरबी समुद्रावर 22.0N अक्षांश आणि 64.5E रेखांशाजवळ केंद्रित होते.

हे वादळ पश्चिम-नैर्ऋत्येकडे सरकून रविवारपर्यंत (5 ऑक्टोबर) वायव्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात पोहोचेल. सोमवारी सकाळपासून (6 ऑक्टोबर) ते पुन्हा वळून पूर्व-ईशान्य दिशेने जाईल आणि हळूहळू कमकुवत होईल. मंगळवारी (7 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन ते खोल दाब क्षेत्रात (Deep Depression) रूपांतरित होईल.

‘शक्ती’ नावाचा अर्थ काय?
‘शक्ती’ या नावाचा अर्थ तमिळ भाषेत ‘सामर्थ्य’ (Power) असा आहे. 2004 मध्ये जागतिक हवामान संघटनेने (WMO) निश्चित केलेल्या नामकरण प्रणालीनुसार हे नाव श्रीलंका देशाने सुचवले होते.

हवामान विभागाने अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्यांनाही इशारा दिलाय. त्यांनी 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वायव्य अरबी समुद्र, त्याला लागून असलेला ईशान्य अरबी समुद्राचा भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागानं स्पष्ट केलंय.

किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिकृत आणि ताज्या माहितीसाठी IMD च्या वेबसाइमधील या विभागावरील अपडेट चेक करा.

Leave a Comment