02 October rain panjab dakh ; ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात या जिल्ह्यात जोरदार पाऊस पंजाब डख म्हणतात काय.
02 October rain panjab dakh ; पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ८ ऑक्टोबर २०२५ नंतर राज्यातून पाऊस निरोप घेईल आणि त्यानंतर जोरदार पाऊस पडणार नाही सर्वप्रथम, ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान राज्यात चांगले सूर्यदर्शन होईल आणि हवामान कोरडे राहील, फक्त १ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भात, विशेषतः नागपूर, चंद्रपूर, आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे, इतरत्र, शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरचा कोरडा हवामानाचा काळ मिळू शकतो.
मात्र, ३ ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचे सावट तयार होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूरकडे पावसाचे आगमन होईल, त्यानंतर ४ ऑक्टोबरपासून पावसाचा प्रवास पुढे वाढत जाईल आणि ४, ५, ६, आणि ७ ऑक्टोबर या चार दिवसांमध्ये राज्यात परत एकदा पावसाचे वातावरण तयार होईल, हा पाऊस विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खान्देश अशा सर्व भागांमध्ये पडणार आहे.
४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पडणाऱ्या या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये थोडा जास्त जोर राहील, तर काही ठिकाणी पाऊस कमी असेल, विशेषतः नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, लातूर, धाराशीव, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या पट्ट्यात पाऊस पडेल. या काळात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जोराचा पडू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या सोयाबीनबद्दल खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हा शेवटचा पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, कारण ८ ऑक्टोबरनंतर राज्यात चांगले सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यानंतर पाऊस येण्याची शक्यता कमी आहे. पाऊस निघून जाणार असल्याची निसर्गाची चिन्हे दिसत आहेत. नैसर्गिक संकेतानुसार, ज्या भागात जाळेधुई (धुके) दिसते, तिथून १२ दिवसांनी पाऊस निघून जातो. ८ किंवा ९ ऑक्टोबरच्या दरम्यान मोठी धुई किंवा धुके पडेल, ज्यामुळे पाऊस आता निरोप घेत आहे हे स्पष्ट होईल.
ज्या शेतकऱ्यांची जमीन खडकाळ आहे आणि सोयाबीन काढणीला आले आहे, त्यांनी ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात काढणी करू शकता, कारण या काळात कडक ऊन पडेल, स्थानिक वातावरणामुळे अर्ध्या तासासाठी किंवा १५-२० मिनिटांसाठी हलक्या सरी पडू शकतात, परंतु ३ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात नद्या-नाल्यांना पूर येईल असा मुसळधार पाऊस पडणार नाही.
शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की, ४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या चार दिवसांतच राज्यात पुन्हा पावसाचे सावट राहील आणि त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून चांगला सूर्यप्रकाश मिळेल. त्यानंतर तुम्ही सोयाबीन किंवा इतर उडीद यांसारखी पिके काढू शकता. अचानक वातावरणात बदल झाल्यास नवीन संदेश दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे.








