Mansoon rain update ; आज विदर्भातील या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज.
Mansoon rain update ; राज्याच्या काही भागांत सध्या हलका ते मध्यम पाऊस होत असला तरी, बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास आजही (१ ऑक्टोबर २०२५) थबकला होता. आज विदर्भातील नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उद्या, २ ऑक्टोबरपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्याचा विचार केल्यास, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मात्र हलक्या सरींचीच शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी (३ आणि ४ ऑक्टोबर) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज कायम राहील. याच दरम्यान मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
याउलट, कोकण विभागाला दिलासा मिळाला आहे. कोकणात पुढील पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.








