Ladki bahin yojana kyc ; लाडकी बहीण योजना kyc अशी करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस.
Ladki bahin yojana kyc ; लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे चालू ठेवण्यासाठी योजनेतील सर्व भगिनींना eKYC करणे बंधनकारक आहे. अनेक भगिनींना त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही, याबाबत संभ्रम असतो. ही स्थिती तपासण्यासाठी एक सोपी पद्धत तुम्ही वापरू शकता.
विशेषतः ज्या भगिनींची केवायसी झाली आहे, त्यांना याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, कारण सरकारी सर्वरवर लोड असल्याने कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते.त्यामुळे, आपली केवायसी झाली आहे की नाही, हे तपासून घेणे आवश्यक आहे.
केवायसी झाली आहे की नाही, हे तपासण्याची सोपी प्रक्रिया
तुमच्या लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला त्याच अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, जिथे केवायसीची प्रक्रिया केली जाते.
वेबसाईटवर जा: सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या eKYC पोर्टलवर जा.
आधार क्रमांक टाका: जिथे तुम्हाला केवायसी करायची आहे, त्याच ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाका.
संमती द्या: स्क्रीनवर दिसणारी संमती (Consent) स्वीकारा (Accept करा).
ओटीपी पाठवा: त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ (Send OTP) या पर्यायावर क्लिक करा.
एकदा तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केली की, तुमच्या केवायसीची स्थिती लगेच स्क्रीनवर दिसेल. जर तुमची eKYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असेल, तर तुम्हाला स्पष्टपणे संदेश दाखवला जाईल की “तुमची केवायसी ही ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा केवायसी करायची गरज नाही”. याचा अर्थ तुमची केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झाली
असून तुम्हाला पुढील कोणतेही पाऊल उचलण्याची गरज नाही. हा संदेश दिसला नाही, तर तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागेल.








