दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

पंजाबराव डख हवामान अभ्यास ; उद्या पासून पुन्हा पाऊस येणार पाऊस विश्रांती कधी घेणार.

पंजाबराव डख हवामान अभ्यास ; उद्या पासून पुन्हा पाऊस येणार पाऊस विश्रांती कधी घेणार.

पंजाबराव डख हवामान अभ्यास ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे वरुण राजा (पाऊस) आता राज्यामधून निरोप घेण्याच्या तयारीत आहे. काही भागातून ७ ऑक्टोबर रोजी, तर काही भागातून १० ऑक्टोबर पर्यंत पाऊस निघून जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाची एक्झिट १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

सध्या, म्हणजेच ३ आणि ४ ऑक्टोबर दरम्यान, दिवसा वातावरणात स्थिरता राहील आणि कडक सूर्यदर्शन राहील, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

४ ते ७ ऑक्टोबर दरम्यानचा विखुरलेला पाऊस
४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान, राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल, मात्र हा पाऊस अति मुसळधार किंवा मोठा पडणार नाही. या पावसाचा जोर मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा पट्ट्यात असेल.

यामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, अकोट, चांदुर बाजार, दर्यापूर, शेगाव, मेकर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच बुलढाणा, जळगाव, परभणी, बीड, जालना आणि लातूर या जिल्ह्यांच्या काही भागात तुरळक पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील ५, ६, आणि ७ ऑक्टोबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. (पंजाबराव डख)

शेतकऱ्यांसाठी सल्ला आणि आगामी थंडीचा अंदाज
८ ऑक्टोबर नंतर, वरील सर्व भागातूनही पावसाची शक्यता कमी होऊन तो निघून जाण्यास सुरुवात करेल. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे, त्यांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी ७ ऑक्टोबरनंतर सोयाबीन काढणी सुरू करावी. ४, ५, आणि ६ ऑक्टोबर दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येऊ शकतो, म्हणून दुपारी लवकर काम संपवावे आणि पिके झाकण्याची तयारी ठेवावी.

पावसानंतरच्या बदलांनुसार, ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान राज्यात चांगली धुई, धुके आणि धुरळी येण्याची शक्यता आहे. ही धुई (जाळे धुई) आल्यास पाऊस १२ दिवसांत निघून जातो, असे जुने गणित लक्षात घ्यावे. २ नोव्हेंबर पासून मात्र राज्यात तीव्र थंडी जाणवण्यास सुरुवात होईल असा अंदाज डख यांनी दिलाय.

Leave a Comment