दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळी आधीच येणार का?

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळी आधीच येणार का?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या २१ व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी वाट पाहत आहेत. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

सरकारकडून पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण केंद्र सरकारने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अलीकडेच आलेल्या महापुरामुळे शेतमाल आणि शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन केंद्राने या तीन राज्यांतील शेतकऱ्यांसाठी वेळेआधीच हप्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंदाजे २७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातही झालेली पुरपरिस्थिती आणि ऑक्टोबर महिन्यातील दिवाळी लक्षात घेता, केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्याप्रमाणे लवकर मदत जाहीर करेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि आधार लिंकिंग अनिवार्य
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही. तसेच, शेतकऱ्यांचे बँक खाते जर आधारशी लिंक नसेल, तर हे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचणार नाहीत.

पैसे येणार आहेत की नाही, हे कसे तपासावे?
pmkisan.gov.in वर जा.

Know Your Statusक्लिक करा.

आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि चेक करा.

Beneficiary List मध्ये आपले नाव आहे की नाही तपासा.

जर यादीत नाव असेल, तर खात्यात २ हजार रुपये येतील आणि यादीत नाव नसेल तर पैसे येणार नाहीत.

ई-केवायसी कशी करावी?
ऑनलाइन pmkisan.gov.in वर जा.

ई-केवायसी ऑप्शन निवडा.

आधार नंबर आणि कॅप्चा टाका.

ओटीपी टाकून सबमिट करा.

ऑफलाइन (CSC सेंटर किंवा बँक)

बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे ई-केवायसी करा.

त्यासाठी कागदपत्रांसाठी आधार कार्ड, पत्ता पुरावा (बिजली/पाणी बिल) आणि बँक पासबुकची कॉपी लागते.

Leave a Comment