दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Ladki bahin yojana ; लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार.?

Ladki bahin yojana ; लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार.?

Ladki bahin yojana ; राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात हप्ता मिळावा यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी, सध्या पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याला शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

“सध्याच्या पूरपरिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त भागाला अधिकाधिक आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याला शासनाचे प्राधान्य आहे,” असे अदिती तटकरे म्हणाल्या. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता देण्यात यावा. विभागाकडून आम्ही ती प्रक्रिया मान्यतेसाठी दिलेली आहे आणि निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे.”

हप्ता कधी मिळणार?

दिवाळीपूर्वी हप्ता मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. “ज्या क्षणाला निधी प्राप्त होईल, त्या वेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू. सणासुदीच्या कालावधीत जर ती (मंजुरी) आली, तर आम्हाला आनंदच आहे. पण ती जशी येईल, तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment