Ladki Bahin Yojana KYC ; या लाडक्या बहिणींना केवायसी करूनही पैसे बंद होणार.
Ladki Bahin Yojana KYC ; ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.काही पात्र महिलांना eKYC (इलेक्ट्रॉनिक केवायसी) प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचे हप्ते १००% बंद होणार आहेत आणि यासाठी कोणती कारणे आहेत, याबद्दलची माहिती योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून घेण्यात आली आहे.
🔴eKYC प्रक्रिया आणि सध्याची स्थिती.
लाभार्थ्यांना eKYC करण्यासाठी पोर्टलवर एक ‘ब्लिंक’ होणारा (उघडझाप करणारा) पर्याय उपलब्ध आहे, परंतु त्यावर टच केल्यानंतर सध्या ही वेबसाइट चालत नाही किंवा eKYC पूर्ण होत नाही. eKYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमके कोणते लाभार्थी पात्र राहतील आणि कोणते अपात्र होतील, याबद्दलचे स्पष्टीकरण लेख मध्ये दिले आहे.
🔴योजनेसाठी पात्रता निकष
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
रहिवासी: अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याच्या कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
वैवाहिक स्थिती: राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
विधवा योजनेचा लाभ न घेणाऱ्या विधवा महिला, घटस्फोटीत महिला आणि इतर कोणत्याही योजनेतून लाभ न घेणाऱ्या परित्यक्ता महिला/निराधार महिला (जी निराधार अनुदान योजनेतून ₹1500 घेत नाही) या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
वयोमर्यादा: अर्जदार महिलेचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ६५ वर्षांपर्यंत असावे.
बँक खाते: लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे, जेणेकरून DBT (थेट लाभ हस्तांतरण) द्वारे पैसे मिळतील.
उत्पन्न: लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
🔴eKYC करूनही अपात्र ठरणारे लाभार्थी (हप्ते बंद होण्याची कारणे)
ज्या महिलांनी अर्ज करताना खोटी माहिती दिली किंवा जे नियमानुसार अपात्र आहेत, त्यांचे लाभ eKYC नंतर निश्चितपणे थांबणार आहेत. अपात्रतेचे प्रमुख निकष खालीलप्रमाणे आहेत:
उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
आयकरदाता: कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर (Income Tax) भरत असेल. eKYC मध्ये आता महिलेसोबत तिच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबरही घेतला जात असल्याने पारदर्शकता वाढली आहे.
सरकारी नोकरी/निवृत्ती वेतन: कुटुंबातील सदस्य (पती/वडील) कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळात कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन (Pension) घेत असेल.
अपवाद: २.५ लाखाहून अधिक उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र राहतील.
इतर योजनेतून ₹1500 पेक्षा जास्त लाभ: जर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून दरमहा ₹1500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर त्या अपात्र ठरतील.
उदाहरणार्थ: संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला eKYC नंतर १००% बाद होणार आहेत.
राजकीय पद: कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल.
सरकारी मंडळातील पद: कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल.
चार चाकी वाहन: कुटुंबाकडे सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत चार चाकी वाहन (कार, क्रुझर, टेम्पो, इ.) असेल. तथापि, ट्रॅक्टर असल्यास अपात्रता लागू नाही, कारण तो शेतकरी वर्गात मोडतो.
ज्या महिलांचे विनाकारण अर्ज अपात्र ठरले होते, त्यांना eKYC नंतर नक्की लाभ मिळू शकेल. सध्या eKYC करण्याच्या वेबसाइटमध्ये अडचणी (OTP न येणे, इनव्हॅलिड OTP) येत आहेत, ज्या लवकरच १ ते २ दिवसांत सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.








