Drought Declaration Norms ; ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ?
अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं.
ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे .
– यात पिके पाण्याखाली जातात .पिकांची मुळे कुजतात .जमिनीची पोषणतत्व धुवून निघतात .
– साठवण व घरे उद्ध्वस्त होतात .
-हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो
राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष असे आहेत –
– पिकांचे नुकसान : 33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का ?
-पावसाचे प्रमाण : त्या तालुक्यात /गावात 24 तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का ? (एका दिवशी 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस )
-स्थितीची पाहणी : महसूल विभाग कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात
-शेतकऱ्यांची प्रत्यक्ष हानी : शेती शिवाय घर जनावरे रस्ते पाणीपुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो .
– या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करते .
ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर फायदे / मदत (Benefits/Assistance after a wet drought is declared)
ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना खालील शासकीय मदत दिली जाते :
– पीक विमा / नैसर्गिक आपत्ती मदत -33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते .
-कर्जमाफी / कर्ज मोर्टोरिअम – पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी
-महसूल वसुली स्थगिती – सरकारी महसूल वसुली (वीज, पाणीपट्टी, कर) काही काळांसाठी थांबवली जाते .
-नुकसान भरपाई – घर जनावर विहिरी शेततळे पीक साठा यांचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते .
-महात्मा गांधी रोजगार हमी योजना (EGS) -ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढविली जाते .
-इतर सुविधा – चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्यांची मदत, आरोग्य शिबिरे अशी मदतही पुरवली जाते .








