दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Farmer Id card ; फार्मर आयडी कार्ड वरून शेतकऱ्यांची फसवणूक..

Farmer Id card ; फार्मर आयडी कार्ड वरून शेतकऱ्यांची फसवणूक..

🔴तुमचं फार्मर आयडी कार्ड आलं का? (Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu))Farmer Id card

मित्रांनो, राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांची ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack) वर नोंदणी सध्या सुरू आहे. याचा अर्थ, शेतकऱ्यांच्या जमिनीला त्यांचे आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया चालू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यावर नोंदणी केली आहे आणि या नोंदणीकृत शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे.

🔴डिजिटल फार्मर आयडीची खरी माहिती:

केंद्र शासनाने आतापर्यंत फक्त ‘अॅग्रीस्टॅक’वर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे डिजिटल फार्मर आयडी नंबर जनरेट केले आहेत. कुठल्याही प्रकारचे फार्मर आयडी कार्ड हे प्रत्यक्ष स्वरूपात (फिजिकल) वापरण्याची गरज नाही. शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कुठलेही कार्ड अद्यापपर्यंत जनरेट करण्यात आलेले नाही.

🔴होणारी फसवणूक आणि शासनाचा इशारा:

काही संस्था आणि सीएससी (CSC) सेंटर शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी कार्ड’ बनवून देण्याचे आमिष दाखवत आहेत. हे कार्ड विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा कर्जासाठी वापरले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपयांचा खर्च घेतला जात आहे आणि शेतकऱ्याची गोपनीय माहिती (जसे की आधार नंबर, मोबाईल नंबर) काही वेबसाइट्सवर वापरली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते, त्यांचा डेटा चोरीला जाऊ शकतो आणि नको असलेल्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागू शकतो.

🔴कृषी आयुक्तालयाच्या स्पष्ट सूचना:

या फसवणुकीच्या अनुषंगाने, कृषी आयुक्तालयाने कृषी सहसंचालक व सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत:

राज्यामध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड बनवून देण्याची आमिष दाखवली जात आहेत आणि पैसे घेऊन कार्ड बनवून दिले जात आहेत.

अशा प्रकारचे कुठलेही कार्ड वैध (Valid) नाही आणि शासनाने अशा प्रकारचे कार्ड जनरेट केलेले नाही. फक्त शेतकऱ्याचा जनरेट झालेला जो युनिक आयडी नंबर आहे, म्हणजेच फार्मर आयडी नंबर आहे, तोच नंबर सध्या आवश्यक आहे. याशिवाय कुठल्याही कार्डची गरज नाही.

अशा प्रकारचे कार्ड बनवू नये आणि बनवलेले कार्ड कुठल्याही कामासाठी वैध नाही, अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसिद्धी करावी.

शेतकऱ्यांसाठी आवाहन:
सध्या बनवले जाणारे कार्ड हे खोटे (Fake) आहेत आणि या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे, असे कुठलेही कार्ड बनवून घेण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, हे कार्ड बनवण्यासाठी आपला फार्मर आयडी, आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा आपले नाव अशा प्रकारची कोणतीही गोपनीय माहिती कोणापर्यंतही पोहोचवू नका.

सध्या फक्त आणि फक्त ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत केलेल्या नोंदणीतून आलेला फार्मर आयडी नंबर हा डिजिटल नंबरच तुम्हाला लागणार आहे. कार्डची गरज नाही. भविष्यात कार्ड कधी जनरेट होतील, वाटप सुरू झाल्यास किंवा त्याचे फायदे काय असतील, याबद्दलची माहिती नंतर दिली जाईल.

Leave a Comment