Ladki bahin kyc process ; मोबाईल मधून अशी करा लाडकी बहीण योजनेची केवायसी.
Ladki bahin kyc process ; लाडकी बहिण योजनेसाठी मोबाईलवरून eKYC करण्याची सोपी पद्धत जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असाल आणि तुमची eKYC अजून पूर्ण झाली नसेल, तर आता तुम्ही ती थेट तुमच्या मोबाईलवरूनही सहज करू शकता. मोबाईलमधून eKYC कशी करावी, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. वेबसाइटवर प्रवेश कर
सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील गुगलमध्ये www.ladkibahin.maharashtra.gov.in हे वेब ॲड्रेस शोधा.
शोध परिणामांमध्ये दिसणाऱ्या याच वेबसाइट लिंकवर (www.ladkibahin.maharashtra.gov.in) क्लिक करून वेबसाइट उघडा.
वेबसाइटवर दिसणाऱ्या ‘लाडकी बहिणसाठी इ केवायसी प्रक्रिया’ या टॅबवर क्लिक करा.
२. लाभार्थी महिलेची आधार माहिती भरा,
तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) दिलेल्या बॉक्समध्ये प्रविष्ट करा
त्याखाली दिलेला कॅप्चा (Captcha) जसाच्या तसा खालील बॉक्समध्ये भरा.
‘
मी सहमत आहे’ या टॅबवर टच करून ‘ओटीपी पाठवा’ (Send OTP) या बटनावर क्लिक करा.
तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा किंवा दहा अंकी ओटीपी (OTP) टाका आणि ‘स्थापित करा’ (Verify) या बटनावर टच करा.
३. पती/वडिलांची आधार माहिती प्रविष्ट करा
विवाहित असाल:तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाका.
अविवाहित असाल: तर तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाका.
पुन्हा दिलेला कॅप्चा (Captcha) भरा.
‘मी सहमत आहे’ या बटनावर टच करून ‘ओटीपी पाठवा’ यावर क्लिक करा, त्यांच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि ‘स्थापित करा’ या बटनावर टच करा.
४. जात प्रवर्ग आणि घोषणापत्र (Declarations) भरा,
तुमचा जात प्रवर्ग (Caste Category) योग्यरित्या निवडा.
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
तुमच्या कुटुंबात एखादी लाभार्थी नोकरीला नाही का?’ – यावर होय करा.
तुमच्या कुटुंबात फक्त एक किंवा दोनच महिला लाभ घेत आहेत?’ – यावर होय करा.
दिलेल्या घोषणापत्र चौकोनाला (Declaration Checkbox) टच करून सहमती दर्शवा.
शेवटी, ‘स्थापित करा’ (Verify) या बटनावर टच करा.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होताच, तुमची eKYC यशस्वीरित्या कम्प्लीट होईल.








