दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Nuksaan bharpaai 2025 ; नुकसान भरपाई 2025 यादी जाहीर पहा.

Nuksaan bharpaai 2025 ; नुकसान भरपाई 2025 यादी जाहीर पहा.

Nuksaan bharpaai 2025 ; राज्यातील १७ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, कारण केवायसी (KYC) प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

या वर्षीच्या जून आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, शासनाने बाधित शेतकऱ्यांसाठी निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल.

🔴 जिल्हानिहाय निधी आणि बाधित शेतकरी

शासनाने मंजूर केलेल्या निधीची जिल्हानिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे:

1) नांदेड: ७७,४३,०१३ शेतकऱ्यांसाठी ५५३ कोटी ४८ लाख ८२ हजार रुपये.
2)परभणी (ऑगस्ट): १,५१,४१२ शेतकऱ्यांसाठी ७६ कोटी ९१ लाख रुपये.
3)सांगली (ऑगस्ट): १३,४७५ शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी ५ लाख ३८ हजार रुपये.
4)बुलढाणा: ८,३९७ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ८० लाख ८६ हजार रुपये.
5)चंद्रपूर: १३,७४२ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ३३ लाख रुपये.
6)सोलापूर:५९,११० शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ९७ लाख १७ हजार रुपये.
7)परभणी (जून): ८,११७ शेतकऱ्यांसाठी ५ कोटी १६ लाख ४२ हजार रुपये.
8)नागपूर: ७,४५० शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये.
9)धाराशिव (जून): २६६ शेतकऱ्यांसाठी २२ लाख २ हजार रुपये.
10)अकोला: १४,०४१ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ९९ लाख ६८ हजार रुपये.
11)हिंगोली (जून): ३९५ शेतकऱ्यांसाठी १८ लाख २८ हजार रुपये.
12)रत्नागिरी: ५६० शेतकऱ्यांसाठी १२ लाख ९६ हजार रुपये.
13)सिंधुदुर्ग: ३३५ शेतकऱ्यांसाठी १२ लाख ६३ हजार रुपये.
14)रायगड: ९८० शेतकऱ्यांसाठी ११ लाख ८१ हजार रुपये.
15)सांगली (जून): १५७ शेतकऱ्यांसाठी ६ लाख ८३ हजार रुपये.
16)वर्धा: ८२१ शेतकऱ्यांसाठी ४१ लाख ४५ हजार रुपये.
17) सातारा (ऑगस्ट): १४२ शेतकऱ्यांसाठी ३ लाख २३ हजार रुपये.
18) कोल्हापूर: ८७२ शेतकऱ्यांसाठी ६० लाख ११ हजार रुपये.

🔴 हेक्टरी ८,५०० ते २७,५०० रुपयांपर्यंत मदत

नुकसान भरपाई शासनाच्या नियमांनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाईल. यामध्ये:

कोरडवाहू (जिरायती) पिके: प्रति हेक्टर ८,५०० रुपये.
फळबागा: प्रति हेक्टर १७,५०० रुपये.
बहुवार्षिक पिके: प्रति हेक्टर २७,५०० रुपये.

🔴दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट.

कृषी विभागाने तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्या मदतीने नुकसानीचा डेटा गोळा केला आहे, जो जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होताच, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेची गती वाढवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

Leave a Comment