दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Panjab dakh rain update ; पंजाब डख म्हणतात राज्यात फक्त एवढे दिवसच सूर्यदर्शन.

Panjab dakh rain update ; पंजाब डख म्हणतात राज्यात फक्त एवढे दिवसच सूर्यदर्शन.

 

Panjab dakh rain update ; पंजाब डख यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यात अनेक भागातील जोरदार पावसाचा जोर ओसरनार आहे, आज २९ सप्टेंबर पासून सूर्यदर्शन होण्याची आणि पाऊस उघडण्याची शक्यता आहे असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

आज २९ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राकडील (मुंबई, पुणे, नाशिक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव) भागांमध्ये पावसाचा जोर थोडा राहण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ मराठवाड्यात पाऊस विश्रांती घेनार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, आज २९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होईल. ३० सप्टेंबर, १, २ आणि ३ ऑक्टोबर या चार दिवसांदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चांगले सूर्यदर्शन होईल आणि हवामान कोरडे राहणार आहे.

ही पावसाची एक मोठी आणि महत्त्वपूर्ण विश्रांती असणार आहे. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे, त्यांनी या कोरड्या हवामानाचा फायदा घेऊन २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या वेळेत काढणीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत, असा सल्ला डख साहेबांनी दिला आहे.

तथापि, ही विश्रांती कायमस्वरूपी नसून, ४ ऑक्टोबर पासून राज्यात पावसाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. ४, ५, ६ आणि ७ ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होईल. पावसाची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी विदर्भातून (वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम) होईल. त्यानंतर ५ ऑक्टोबरला तो मराठवाड्याकडे सरकेल आणि ५, ६, ७ ऑक्टोबर दरम्यान मुंबई, पुणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल.

या पावसाचा वेगही सध्याच्या पावसाप्रमाणेच मुसळधार राहण्याची शक्यता आहे. मात्र, ८ आँक्टोंबर पासून राज्यात परत सूर्यदर्शन होईल आणि या हंगामातील पाऊस राज्यातून पूर्णपणे निघून जाईल आशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

Leave a Comment